महत्वाच्या घोषणा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेसह आगामी सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय करोना संकटाच्या पार्श्वभूनीवर राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. आयोगाच्या परीक्षेचे सुधारित नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरद्वारे सांगण्यात आलं आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
भारत सरकारच्या सशस्त्र सीमा दलात विविध कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सशस्त्र सीमा दलातील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण १५२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॉन्स्टेबल पदांच्या एकूण १५२२ जागाचालक पदांच्या ५७४ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या २१ जागा, पशुवैद्यकीय पदांच्या १६१ जागा, आय्या (महिला) ५ पदांच्या जागा, मोची पदांच्या २० जागा, गार्डनर पदांच्या ९ जागा, कुक (पुरुष) पदांच्या २३२ जागा, कुक (महिला) पदांच्या २६ जागा, वॉशरमन (पुरुष) पदांच्या ९२ जागा, वॉशरमन (महिला) पदांच्या २८ जागा, नाव्ही (पुरुष) पदांच्या ७५ जागा, नाव्ही (महिला) पदांच्या १२ जागा, सफाईवाला (पुरुष) पदांच्या ८९ जागा, सफाईवाला (महिला) पदांच्या २८ जागा, जल वाहक (पुरुष) पदांच्या १०१ जागा, जल वाहक (महिला) पदांच्या १२ जागा आणि वेटर (पुरुष) पदांच्या १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी १००/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसापर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
सरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर बेरोजगारांनी नोंदणी कशी करावी ?
राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि औद्द्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना उपलब्ध असलेले कुशल/ अकुशल कामगाराचा शोध घेणे सोपे होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ‘महाजॉब्स’ नवीन पोर्टल सुरु केलं आहे.
कंपन्यांना हवे असलेल्या नोंदणीकृत कामगारांची माहिती पोर्टलवर उपलब्ध होत असल्याने बेरोजगार आणि रोजगार देणारे (कारखाने) मधील अंतर कमी झाल्याने पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात (कंपनी) काम/ नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या बेरोजगारांनीच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
१) ‘महाजॉब्स’ नोंदणीसाठी http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
२) प्रथम तुमचे नाव टाईप करा.
२) प्रथम तुमचे नाव टाईप करा.
३) तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी मिळवा, मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करा. तसेच ईमेल आयडी टाकून ओटीपी मिळवा आणि ई-मेल वर ओटीपी पडताळणी करून घ्या.
टीप – ईमेल आयडी पर्यायी आहे परंतु आपण सादर केल्यास पडताळणी अनिवार्य आहे. ईमेल आयडी पोर्टलवरील संवादासाठी वापरली जाऊ शकते, याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी. (Email ID is optional but verification is mandatory if you enter. Email ID can be used for communication on portals such as job notifications etc. It can also be used as a user ID to log in to the portal.)
४) आपल्या आवडीचा किंवा हवा असलेला मनाप्रमाणे पासवर्ड टाकून परत एकदा पासवर्डची पुष्टी करा.
५) त्यानंतर दिसत असलेला कॅपच्या (captcha) व्यवस्थित टाईप करून सबमिट करा.
पासवर्ड – प्रथम आपला पासवर्ड हा कॉम्प्लेक्स असावा हे लक्षात ठेवून त्यात किमान 8 कॅरेक्टर्स असावे, तसेच पासवर्डमध्ये किमान 1 कॅपिटल अक्षर+1 लोअरकेस अक्षर , 1 नंबर आणि 1 स्पेशक कॅरेक्टर्स (जसे $, @, #) असणे आवश्यक असून आपल्या पासवर्डची नोंद करून ठेवायला विसरू नका. (Password Length should be minimum 8 characters and maximum 20 characters. Password must contain atleast 1 UpperCase Alphabet, 1 LowerCase Alphabet, 1 Number and 1 Special Character.)
६) त्यानंतर सदरील युजरनेम आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करून तुमची शैक्षणिक संबंधित सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
७) तसेच शैक्षणिक माहिती बरोबरच तुम्ही एखाद्या कामामध्ये पारंगत, कुशल असल्यास तुमच्या कौशल्याविषयी माहिती भरू शकता.
७) तसेच शैक्षणिक माहिती बरोबरच तुम्ही एखाद्या कामामध्ये पारंगत, कुशल असल्यास तुमच्या कौशल्याविषयी माहिती भरू शकता.
८) तुम्ही सर्व माहिती भरून नोंदणी करुन सबमिट केल्यानंतर ‘Registration done successfully’ असा मेसेज येईल, मेसेज आल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल…
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८५ जागा
मुंबई येथील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे इय्यता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र अर्थात एनसीव्हीटी प्रमाणपत्र असावे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे जाहिरात पाहा
ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ३९ जागा
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३९ जागा
उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, लेखापाल, लोअर डिव्हिजन लिपिक आणि परिचर (कार्यालय) पदांच्या जागा
उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, लेखापाल, लोअर डिव्हिजन लिपिक आणि परिचर (कार्यालय) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Post a Comment